
ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय हे जिल्हा पोलीस प्रशासनाचे मध्यवर्ती व महत्त्वाचे केंद्र आहे. मुख्यालयातून राखीव पोलीस बल व्यवस्थापन, शस्त्र व दारूगोळा भांडार, दंगा नियंत्रण पथक सज्जता, व्हीआयपी व आस्थापना सुरक्षा, सण-उत्सव बंदोबस्त नियोजन, पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा ही सर्व प्रशासकीय कामे राखीव पोलीस निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली पार पाडली जातात.