
उद्दिष्टे :
* जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक रोखणे.
* गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
* अवैध कत्तल व गोवंश तस्करीविरुद्ध प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करणे.
* संबंधित विभागांशी समन्वय साधून संयुक्त कारवाई करणे.
* गोपनीय माहिती संकलित करून विशेष मोहिमा राबविणे.
कार्ये :
* अवैध गोवंश वाहतुकीवर लक्ष ठेवणे व तपासणी करणे.
* प्राप्त तक्रारींवर तात्काळ कारवाई करणे.
* गोवंशाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे.
* जप्त जनावरांची सुरक्षित देखभाल व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थांशी समन्वय साधणे.
* जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे.
कार्यक्षेत्र :
ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोवंश संरक्षणाशी संबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे व आवश्यक कारवाई करणे.